वाशिम, दि. 20 : खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय वाशिम अंतर्गत सन 2023-24 या वर्षात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी बॅकांमार्फत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मधकेंद्र योजनेअंतर्गत मधमाशा पालन प्रशिक्षण व साहित्य वाटप आदी योजनांचा यामध्ये समावेश आहे.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत प्रक्रीया व उत्पादन उद्योगाकरीता ५० हजार रुपये ते ५० लाख रुपयापर्यंत कर्ज प्रस्ताव ऑनलाईन करुन या कार्यालयामार्फत बॅकांना शिफारस करण्यात येते. यामध्ये मागासवर्ग, महिला, अल्पसंख्यांक व दिव्यांग व्यक्तीस मंजुर प्रकल्पाच्या ३५ टक्के ग्रामीण भाग व शहरी भागासाठी २५ टक्के अनुदान दिले जाते.
मधमाशा पालन उद्योगाकरीता १० दिवस निवासी प्रशिक्षण स्थानिक ठिकाणी विनामुल्य दिले जाते. प्रगतशिल मधपाळ/ संस्था यांना २० दिवसाचे निवासी प्रशिक्षण मध संचालनालय महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे विनामुल्य दिले जाते. खादी व ग्रामोद्योग मंडळ, ( ग्रामिण भाग) व जिल्हा उद्योग केंद्र (शहरी भाग) करीता नव्याने उद्योग उभारणीसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारले जात आहेत.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय दागडीया सदन, सिव्हील लाईन रोड, तहसील कार्यालय समोर, वाशिम येथे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर (9922204804) यांच्याशी संपर्क साधावा आणि शहरी भागासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यस्थापक संजय खंबायत (8421115831), शासकिय दुध डेअरी समोर, राजस्थान आर्य कॉलेज रोड, वाशिम यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.