महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले ध्वजारोहण :उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा,: महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा येथील पोलिस कवायत मैदानावर पार पडला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी परेडची पाहणी केली. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र दिनाच्या 64वा वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस दल आणि होमगार्डने मानवंदना दिली. परेड निरीक्षण केल्यानंतर परेड संचलन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक इंगळे, पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, पोलिस हवालदार विकास खानझोडे, सुखदेव ठाकरे, संजय नागरे, चालक पोलीस हवालदार शेख वसीम शेख मेहबूब यांचा सन्मानचिन्ह आणि विशेष सेवा पदक देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मासरूळ, ता. बुलढाणाचे तलाठी एस. पी. शहागडकर यांना प्रशस्तीपत्र आणि आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता कालावधीत भरीव कामगिरी केल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक आर. एम. माकोडे, दुय्यम निरीक्षक आर. आर. उरकुडे, जवान एस. एस. जाधव, एन. एम. सोळंकी, पी. एच. पिंपळे, श्रीमती एस. एस. उंबरहंडे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मनरेगाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीबद्दल तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, कृषी सहाय्यक रवींद्र जाधव, वासुदेव भोई, शंकर वाघमारे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड, अक्षय गाडगे, जयश्री ठाकरे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नाझर गजानन मोतेकर आणि मंगेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले.