१०९ औरंगाबाद (पूर्व)च्या महिला मतदारांचा निर्धार, ‘मतदान करणारच’
ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आदिती निलंगेकरच्या उपस्थितीने महिला उत्साही
पोलीस डायरी वार्ताहर,छत्रपती संभाजीनगर:- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आज १०९ औरंगाबाद (पूर्व) विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांसाठी मतदार जनजागृती अभियान ‘स्वीप’ च्या माध्यमातून राबविण्यात आले. आज या कार्यक्रमात महिला मतदारांनी ‘ आम्ही मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला’. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आदिती निलंगेकर हिच्या उपस्थितीमुळे महिलांमध्ये उत्साह संचारला होता.
१०९ औरंगाबाद (पूर्व) विधानसभा क्षेत्रातील सेंट फ्रांन्सिस हायस्कुल येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.चेतन गिरासे, मतदार जनजागृतीच्या ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आंतराष्ट्रीय जलतरणपटू तसेच मुख्य पोस्ट कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील असीस्टंट पोस्टल अधिकारी कुमारी अदिती अविनाश निलंगेकर, स्वीप नोडल सिताराम पवार, सहा. नोडल विजय पाटोदी, तहसिलदार पल्लवी लिगदे, तहसिलदार रमेश मुनलोड आदी उपस्थित होते.
अदिती निलंगेकर यांनी उपस्थित महिलांना ‘मतदान करणारचं!’ तसेच ‘माझ्या कुटुबियांचे देखील मतदान करुन घेणार’ असे घोषणा उच्चारुन घेतली. या कार्यक्रमास उच्च न्यायालयातील महिला कर्मचारी, चाटे स्कुल, वुडरीज स्कुल बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अंगणवाडी सेविका, मदतनिस महिला कर्मचारी, सेंट लॉरेन्स, सिडको कार्यालय, किडस मॅजीक, सेंन्ट पॅट्रीक, संस्कार विद्यालय, ज्ञानदा शाळा इ. विविध ठिकाणच्या महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक सिताराम पवार यांनी केले. तर विजय पाटोदी यांनी परिचय करुन दिला. इलोरा पब्लीक स्कुलच्या संगीत वाद्यवृंदाने ‘मतदान पाळणा’ सादर केला.
डॉ.चेतन गिरासे यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले की, भारतातील विविध महिला केंद्रीत चळवळींनी आणि महिलांच्या सहभागातुन विविध क्षेत्रात यश मिळवले आहे. मतदार जनजागृती करण्यात व त्यातून मतदानाचा टक्का वाढविण्यात महिला महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
श्रीमती पल्लवी लिगदे यांनी मतदानाचे महत्त्व विविध उदाहरणांसह उपस्थित महिलांना सांगितले. रमेश मुनलोड आभार मानले. योग शिक्षक सुरेश शेळके यांनी हास्य योगा सादर केला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विजय गवळी, प्रल्हाद शिंदे, संतोष गाडेकर, चंद्रकांत पवार, सुनिल पवार यांनी परिश्रम घेतले.