जळगाव मतदार संघाचे सर्वसामान्य निरीक्षक आणि जळगाव जिल्ह्यासाठीचे पोलीस निरीक्षक दाखल
तिन्ही निरीक्षकांचे संपर्क क्रमांक जाहीर
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, जळगाव – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाकरिता सर्वसामान्य निरीक्षक निश्चित करण्यात आले असून
गुजरात केडरचे 2004 बॅचचे IAS अधिकारी डॉ.राहुल बाबुलालभाई गुप्ता यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे जळगावांत आगमन झाले आहे. 8275970667 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रारी करू शकतात. तसेच प्रियंका मीना ( आय.पी. एस ) यांची जळगाव जिल्ह्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्याशी 8275970669 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रारी करू शकतात. निरीक्षकांसाठी अजिंठा विश्रामगृह येथे स्वतंत्र कार्यालय असणार असून राजकीय पक्ष उमेदवार व मतदार अजिंठा विश्रामगृह येथे असलेल्या कार्यालयात किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधू शकता असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी कळविले आहे.