महायुतीचे लोकसभा उम्मेदवार सुधीर मुनगंटीवार यांची वणी येथे सभा
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती
पोलीस डायरी प्रतिनिधी: सध्या लोकसभा निवडणुकीची रण धुमाळी आणि उमेदवारांची प्रचाराची लगबग पाहता चंद्रपुरातील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार श्री.सुधीर मुनगंटीवार यांची प्रचार सभा वणी येथे पार पडली. या प्रचार सभेत मनसेचा नेता म्हणून आज उपस्थित राहून संबोधित केले.
सन्माननीय राज साहेबांनी जी भूमिका घेऊन भाजपला पाठिंबा दिला यामुळे या महायुतीच्या उमेदवाराला नक्कीच बळ मिळेल. मनसेचे संपूर्ण महाराष्ट्र सैनिक, पदाधिकारी सुधीरभाऊंच्या सोबत राहून, त्यांना निवडून आणण्याची पूर्णपणे शाश्वती व्यासपीठावरून दिली. मतदारसंघांमध्ये मनसेचे असलेले प्राबल्य पाहता देवेंद्रजी फडणवीस यांनी मनसेचे आभार मानले. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना जास्तीत जास्त लीड मनसेचा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वणी विधानसभा क्षेत्रात तसेच महाराष्ट्रभर माझ्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेत आजवर राबवलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक करत अभिनंदन केले. सर्वसामान्यांची सेवा केल्यावर इतर पक्षांतील नेतेमंडळी दखल घेत असतात, याचा प्रत्यय आज आला.
येत्या १९ एप्रिल रोजी सुधीर मुनगंटीवार यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे, असे आवाहन मतदारांना केले. प्रसंगी मनसे सर्व अंगीकृत संघटना व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक उपस्थित होते.
Raj Thackeray Amit Thackeray मनसे वृत्तांत अधिकृत MNS Adhikrut Sudhir Mungantiwar Devendra Fadnavis BJP Maharashtra