7 एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट: गारपीटची शक्यता
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर, : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार 7 एप्रिल 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची तसेच गारपीटची शक्यता वर्तविण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविले आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.