आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांनी मंजूर 150 कोटी रुपयांच्या 192 विकास कामांच्या भूमिपूजनाला सुरवात.
कार्यकर्त्यांना भूमिपूजनाचा मान, भूमिपूजनाचा विक्रम, चार दिवस चालणार भूमिपूजन सोहळा
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून विविध विभागाच्या निधी अंतर्गत मंजुर मतदार संघातील 150 कोटी रुपयांच्या 192 विकासकामांच्या भूमिपूजनाला आज सुरवात झाली असून आज ८८ कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व भुमिपूजनाचा मान आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. या विकासकामांमुळे नागरिकांच्या सोयी सुविधेत भर पडणार आहे. सदर भूमिपूजन सोहळा पुढील चार दिवस चालणार असून हा भूमिपूजनाचा विक्रम असल्याचे बोलल्या जात आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी खेचुन आणला आहे. या निधीतून शहरी भागासह ग्रामीण भागात विकासकामे केल्या जात आहे. मतदार संघात अभ्यासिका आणि समाज भवन तयार करण्यावर आमदार किशोर जोरगेवार यांचा भर राहिला आहे. त्यांच्या प्रयत्नातून मतदार संघात 11 अभ्यासिका तयार केल्या जात आहे. तर ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात समाज भवनांचे काम सुरु आहे. दरम्यान विविध विभागाच्या निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांनी तब्बल 150 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. या निधीतुन ग्रामीण व शहरी भागातील 192 विकास कामे केल्या जाणार आहे. आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते विविध ठिकाणी सदर कामांचे भुमिपूजन करण्यात आले आहे. हा भुमिपूजनाचा विक्रम असुन या कामांमुळे नागरिकांच्या सोयी सुविधेत भर पडणार आहे.
चंद्रपूरच्या जनतेने अपक्ष आमदार म्हणून देशात सर्वाधिक मत्ताधीक्क देत मला निवडून पाठविले आहे. स्वाभाविकच त्यांच्या अपेक्षा माझ्याकडून आहेत. त्यामुळे नागरिकांना हवे त्या कामाला प्राधाण्य देण्याचा प्रयत्न आपला राहिला आहे. माझा कोणता पक्ष नाही. मात्र चंद्रपूरची जनता आणि कार्यकर्ते हा माझा पक्ष आहे. त्यामुळे आपण मंजूर केलेल्या 192 विकासकामांचे भुमिपूजन कार्यकर्त्यांच्या हस्ते करत आहोत. याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रभागातील समस्या आमच्या प्रयत्न पोहचत असतात. त्यामुळे त्यांचा व त्यांच्या कार्याचा हा सन्मान असल्याचे ते यावेळी म्हणाले. आपण अपक्ष आमदार म्हणून निवडून पाठविले आहे. मात्र अपक्ष असुनही आपण चंद्रपूरच्या विकासासाठी कधिही निधी कमी पडू दिला नाही. आवश्यक त्या सर्व गोष्टींसाठी आपण निधी उपलब्ध करुन दिला आहे. चंद्रपूरात सुरु झालेला विकासाचा झंझावात थांबणारा नाही. पूढेही आपण नागरिकांना अपेक्षित असलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देऊ असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बाबुपेठ, जुनोना चौक, भिवापूर, पठाणपुरा, जलगनर, तुकुम, वडगाव, रहमत नगर, मोहम्मदीया नगर, बंगाली कॅम्प, इंदिरा नगर, संजय नगर, दाताडा, वृंदावन नगर, तुलसी नगर, राष्ट्रवादी नगर, येरूर, घुघुस यासह शहरातील व ग्रामीण भागातील विविध ठिकाणचे भुमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमांना स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.