माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या नुतनीकरणाचे उद्घाटन
पोलीस डायरी वार्ताहार, छत्रपती संभाजीनगर:- जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान कक्षाचे नुकतेच नुतनीकरण पूर्ण झाले. या कक्षाचे आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतून या कक्षाचे नुतनीकरण करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी राष्ट्रीय सूचना केंद्र अनिल थोरात, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर, वरिष्ठ सहाय्यक अभियंता राजेश हापसे, वरिष्ठ नेटवर्क अभियंता आशिष कणके, जिल्हा समन्वयक महा आयटी अण्णासाहेब सातपुते, जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके आदी उपस्थित होते.
या विभागामार्फत ई- ऑफिस, आपले सरकार सेवा केंद्र, आपले सरकार तक्रार प्रणाली, ऑनलाइन सेवा-हमी कायदा, आधार सेवा, दूरदृष्य प्रणाली व्यवस्थापन(video conference), भारतनेट, अर्बन-नेट, ई- गव्हर्नन्स प्रशिक्षण , ई-डिस्ट्रिक्ट इ. प्रकल्प हाताळले जातात.