देवानंद साखरकर यांच्याद्वारे घेतलेल्या वन्य जीवांच्या छायाचित्रांसाठी आवर्जून केला सन्मान, गुण जोपासक आहेत सुधीर मुनगंटीवार वन मंत्री
पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर,: ताडोबा महोत्सवातील समारोपीय कार्यक्रमांमध्ये मागील वीस वर्षात काढलेल्या वन्यजीवांचे छायाचित्रातील योगदानाबद्दल जागतिक वन्यजीव दिवशी देवानंद साखरकर यांचा सन्मान मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार ,उत्तराखंडचे वनमंत्री सुबोध उन्नीयाल, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उत्तराखंडचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुप मलिक, जिल्हाधिकारी विनय गौडा, सीआयडी फेम शिवाजी साटम, उपस्थित होते. या सन्मानाने दोन दशकातील सचोटीने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करून साखरकर यांच्या कार्यास उत्तेजन देण्याचे कार्य या प्रसंगी केलें म्हणजे खरोखर गुण जोपासक असल्याचे प्रत्यन्तर सुधीर मुनगंटीवार यांनी या सन्मानाच्या निमित्ताने करून दिले आहे.