पो. डा. प्रतिनिधी, नाशिक शहर, जिग्नेश जेठवा:
सातपूर पोलीस ठाणे हद्दीत श्रमिक नगर, कार्बोन नाका, शिवाजी नगर, सातपूर गाव, अशोक नगर व नजीकच्या लगतच्या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेवर दहशत कायम राहावी यासाठी अक्षय युवराज पाटील वय २८ वर्षे रा. आनंद सागर अप्पर्टमेन्ट रूम नं. ५, श्रमिक नगर , सातपूर नाशिक याने सर्वसामान्य नागरिकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार व मारहाणकरून लोकांच्या मनात भींती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्यास दि. ११/३/२०२१ रोजी एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते.
अक्षय युवराज पाटील याने हद्दपार कालावधी मध्ये पुन्हा गुन्हेगारी कृत्य चालू ठेवून जनजीवन विस्कळीत केल्याने मा. पोलीस आयुक्त यांनी एम पी डीए कायदा सॅन १९८१ चे कलाम ३(२) अन्वये स्थानबद्ध करणे बाबतचे आदेश दि. ०८/०२/२०२३ रोजी जारी केले होते. स्थानबद्धतेची कार्यवाही चुकविण्यासाठी आरोपी अक्षय युवराज पाटील हा अल्पवयीन मुलीला अपहृत करून फरार होता. अशातच गुंड विरोधी पथकाने सपोनी/ ज्ञानेश्वर मोहिते यांना प्राप्त गोपनीय माहिती मिळाली, कि अक्षय पाटील हा हैद्राबाद तेलंगणा येथे अल्पवयीन मुलीसह राहत आहे. माहितीच्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंड विरोधी पथक आणि अंमलदार यांनी आरोपी अक्षय पाटील यास अथक प्रयत्नानि हैद्राबाद येथे शोध घेऊन ताब्यात घेतले.
या शोध कामी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, नाशिक शहर, श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे , श्री वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, द की पवार, प्रदीप ठाकरे, मिलीं जगताप, मपोअं/ मनीषा कांबळे यांनी संयुक्तरित्या पार पडली आहे.