राजुर येथे बंजारा समाज बांधवांच्या वतीने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
*बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार धर्मवीर शश्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून बुलढाणा शहरातील मलकापूर रोड येथे संत श्री सेवालाल महाराज यांचे स्मारक तसेच मंदिरासाठी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले….!
आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी बंजारा समाज बांधवांच्या वतीने रामेश्वर महादेव संस्थान राजूर येथे आयोजित केला होता, या मेळाव्यामध्ये धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांचा सर्व बंजारा समाज बांधवांचे वतीने यावेळी त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला…!
यावेळी त्या ठिकाणी बंजारा समाजातील मान्यवर तसेच शिवसेना,युवासेनेचे सर्व पदाधिकारी तसेच समस्त बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…