पो. डा. प्रतिनिधी धुळे, : धुळे जिल्हातील अक्कलपाडा धरणातून धुळे शहरात पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने वेळोवेळी निवेदने, अर्ज देऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील मागणीकडे दुलक्ष केले. ऐन उन्हाळ्यात पाण्याने नागरिकांच्या डोळ्यात मात्र पाणी आणले आहे. असं असताना नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी धडपड करणारे लोकप्रतिनिधी या ना त्या मार्गाने समस्या सोडवावी म्हणून प्रयत्नरत राहतात ते म्हणजे माजी आमदार प्रा. शरद पाटील.
आज देखील ते नागरिकांना पाणी मिळावे या साठी अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात यावे या साठी जिल्हाधिकारी यांच्या भेटीस गेले होते, ‘ तुमचे पाय धरतो पण पाणी प्रश्न सोडवावा, अक्कलपाडा धरणातून नागरिकांना पाणी मिळण्याची तरतूद करून द्यावी’.
मुळात जनतेला पाणी पुरवठा करणे हि अधिकाऱ्यांची जबाबदारीच आहे, पाणी हि मूलभूत गरज आहे, ती लक्षात घेता, नागरिकांच्यासाठी पाण्याची सोया होणे महत्वाचे हा एकमात्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून माजी आमदाराने नागरिकांसाठी अधिकाऱ्याचे पाय धरावे हि प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. हि घटना घडूनही जिल्हाधिकारी याची दाखल घेत नसतील, जनतेच्या समस्या पाहून दुर्लक्ष करत असतील तर दाद मागावी तरी कोणाकडे ? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.