जि.प.च्या रिक्तपदासाठी 15 व 17 ऑक्टोबर रोजी परीक्षा
पोलीस डायरी प्रतिनिधी, वाशिम: जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक आयबीपीएस कंपनीकडून प्राप्त झाले आहे. ही परीक्षा डिजीटल परीक्षा परिसर,गुलाटी टॉवर, शासकीय तंत्रनिकेतन समोर, लाखाळा,रिसोड रोड,वाशिम या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
15 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सकाळी 10.30 वाजता दरम्यान कनिष्ठ लेखा अधिकारी या पदासाठी पहिले सत्रात, सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजता दरम्यान कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदासाठी दुसरे सत्रात तर दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान कनिष्ठ अभियंता (विद्यूत) पदासाठी तिसरे सत्रात. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सकाळी 9.30 वाजता दरम्यान तारतंत्री (वायरमन) पदासाठी पहिले सत्रात. सकाळी 10 ते दुपारी 12.30 वाजतापर्यंत जोडारी (फिटर) पदासाठी दुसरे सत्रात तर दुपारी 1 ते दुपारी 4.30 वाजता दरम्यान पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी तिसरे सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षेकरीता ज्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेकरीता वाशिम परीक्षा केंद्र मिळाले आहे. त्यांचे परीक्षेचे ओळखपत्र व परीक्षेपूर्वी उमेदवारांच्या होणाऱ्या आवश्यक तपासणीबाबत www.zpwashim.in या संकेतस्थळावर सूचना उपलब्ध आहे. तसेच प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करावे. परीक्षाविषयक वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना संकेतस्थळावर कळविण्यात येईल. असे सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांनी कळविले आहे