कथित स्वच्छ नाशिकची लपलेली अस्वच्छता आली चव्हाट्यावर
सुव्यवस्थेचे वाजवले बारा: कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे जनता त्रस्त अधिकारी मस्त !!!
योगेश भट, पोलीस डायरी, ब्युरो चिफ,नाशिक: सर्वत्र महाराष्ट्रात पावसाचा अतिवृष्टीचा इशारा मिळालेला असतानाही निद्रिस्त असलेले नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी काही केल्या काम करेना झालेत. साधारणपणे सर्वत्र पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे, पण नाशिक मनपातील सिडको घरकुले कार्यक्षेत्रात असलेल्या विभागीय कार्यालय मात्र याला अपवाद आहेत. स्मार्ट सिटी च्या चुरशीच्या सामन्यात सहभागी असताना कर्मचाऱ्यांच्या कामचुकारीमुळे मनपा ला मागे पडावे लागेल असे एकंदरीत चित्र आहे. पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता बळावली आहे. काही दिवसात सणासुदीचे दिवस सुरु होणार आहे. अशात स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता स्वच्छतेकडे अधिक लक्ष देत पुर्ण यंत्रणा कार्यन्वित करुन गणरायाच्या आगमनापूर्वी संपुर्ण शहर स्वच्छ न करता टाळाटाळ केल्याचे प्रकार नाशिक मनपामध्ये होत आहेत. सविस्तर वृत्त असे कि, सिडको च्या विविध योजनेंतर्गत तयार झालेल्या घरकुलातील रहिवासी नागरिकांच्या समस्यांकडे नाशिक मनपाचे दुर्लक्ष्य होते आहे. चक्क नागरिकांच्या घरात ड्रेनेज चे पाणी, मानवी विष्ठा घरात आल्याचे प्रसंग येथील नागरिक अनेक वर्षांपासून सहन करीत आहेत. तक्रार केल्यास थातुर मातुर काम करून कर्मचारी पसार होतात. अनेक वर्षांपासून तीच तीच समस्या समोर येते आहे तर त्यावर ती समस्या सोडवणुकीची कार्यवाई मात्र होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गणेश चौक, स्वामी विवेकानंद नगर, उत्तम नगर वैगरे भागातील नागरिकांना अनेक वर्ष पासून या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संबंधित विभागीय आयुक्त आणि त्यांचे कर्मचारी यांचे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होतेय. मग ते दुर्लक्ष जाणीवपूर्वक होते कि अनावधानाने हे मात्र अनाकलनीय गूढ आहे. सिडकोतील घरकुले कालांतराने महानगरपालिकेत हस्तांतरित झाले, त्यानंतर या नागरिकांच्या असलेल्या समस्यांकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्षच होत आहे. ड्रेनेज च्या पाइपलाईन्स जुन्याच आहेत, त्या बदलणे गरजेचे असूनही मनपा प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतोय असे प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर म्हणल्यास वावगे होणार नाही. याच्या माहिती घेण्यासाठी महानगरपालिकेचे विविध अधिकारी यांच्याशी मुख्य संपादक पोलीस डायरी यांनी स्वतः भ्रमरध्वनी द्वारे संपर्क केल्यावर सर्वानी आपापली जबाबदारी झटकण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचा अनुभव आहे, त्यामुळे हि मंडळी सर्व सामान्य नागरिकांना किती मुर्खात गणत असल्याचा जिवंत उदाहरण अधिकारी, कर्मचारी आणि विभागीय आयुक्त मयूर पाटील यांनी दाखवून दिले. एक तर आपली जबाबदारी नीट पार पडायची नाही, आणि नंतर कोणी विचारणा केल्यावर अरेराविची भाषा करायची. त्यामुळे या अशा कामचुकार कर्मचारी आणि अधिकारी याची लोकसेवक असल्याची जाणीव करून देऊन कान उघडणी आलेले आयुक्त कसे करतील या कडे सर्व सिडको च्या नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. तसे ना झाल्यास स्मार्ट सिटी च्या सर्वेक्षणात आणि मनपाला देण्यात येणाऱ्या मालमत्ता करावर याचा उलट परिणाम घडवण्याची नागरिकांमध्ये चर्चा आज ऐकायला मिळाली. विभागात सुव्यवस्था, सुविधा ना दिल्याचा विपरीत परिणाम मनापास मिळणाऱ्या करावर होऊ शकतो. कारण सुविधाच दिल्या नाही तर कर कसला भरायचा?? हा प्रश्न कोर्टात देखील अनेक वेळा चर्चिला जातो. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. याकडे मनापास आता दुर्लक्ष करून चालणार नाही. यावर आता आयुक्त मनपा नाशिक काय पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.