परभणी जिल्ह्यात 24 तासात सरासरी 10.1 मि.मी. पावसाची नोंद
पो डा. प्रतिनिधी, परभणी, : जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी केवळ 10.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस पालम तालुक्यात (16.5 मिमी) झाला असून, त्याखालोखाल सोनपेठ व मानवत (12.7), पुर्णा (10.7), सेलू (9.9), परभणी (9.4 मिमी) झाला आहे. याशिवाय गंगाखेड (8.3 मिमी), पाथरी (6. मीमी ) आणि जिंतूर तालुक्यात (6.2 मिमी) पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद विभागाचा विचार करता गेल्या 24 तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही 12.2 मिमी राहिली आहे.
पीक विम्याची अग्रीम भरपाई मिळण्यासाठी २१ दिवसांचा पावसाचा खंड हा एक प्राॅक्सी ट्रिगर आहे. असे आणखी ५ प्राॅक्सी ट्रिगर आहेत. पण बीड वगळता राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये केवळ २१ दिवसांच्या खंडाचा विचार होत आहे.
पीक विम्यात हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अंतर्गत कोणकोणत्या परिस्थितीत अग्रीम भरपाई मिळू शकते.
1. तीव्र दुष्काळाची स्थिती असल्यास हा ट्रिगर लागू पडू शकतो.
2. ३ ते ४ आठवडे पावसातील खंड आणि सरासरी पावसाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असला तरी सर्वेक्षण आणि पुढची प्रक्रिया सुरु होते.
3. तापमानातील अचानक वाढ किंवा घट होऊन दीर्घ कालावधीतील सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त फरक पडल्यास हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हा ट्रिगर लागू होतो.
4. NDVI अर्थात सामान्यकृत वनस्पती निर्देशांक ः सामान्यकृत वनस्पती निर्देशांक म्हणजे सॅटेलाईट किंवा प्रत्यक्ष शेतात केलेल्या तपासणीत पुढे आलेली पिकाच्या आरोग्याची स्थिती. दुष्काळ, कीड-रोग आणि पुरामुळे पिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. पिकाच्या आरोग्याची स्थिती बदलली की NDVI बदलत असतो. हा NDVI उणे २० ते उणे ३० टक्के असल्यास हा ट्रिगर लागू होतो.
5. मातीतील ओलाव्याचे प्रमाणः जमिनितील ओलाव्याचे प्रमाण जर शुन्य ते उणे ७५ टक्के असेल तर पीकविम्याचा हा ट्रिगर लागू होतो. आपण जमिनित ओलावा आहे असे म्हणतो तेव्हा १०० टक्के ओलावा आहे, असे समजले जाते. शुन्य टक्के ओलावा म्हणजे काहीच ओल नाही. पण दुष्काळी स्थिती किंवा पावसाती खंडामुळे ओलाव्याची टक्केवारी शुन्यापेक्षा कमी किंवा उणे होते.
6. मंडळातील २५ टक्क्यांहून अधिक पेरणी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर कीड, रोगाचा प्रादुर्भाव झाला तरीही हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरनुसार भरपाई मिळू शकते.