पोलीस डायरी : तरुणाई कायम मानसिक तणावात असल्याचे दिसून येते. त्यातच आता सोशल मीडियावरील सततचा वावर, ऑनलाइन गेमचे व्यसन आदी कारणांची भर पडली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अहवालातून मुंबई शहर तसेच उपनगरातील लोक सर्वाधिक ताणतणावात असून, त्यांना मानसोपचाराची गरज असल्याचे समोर आले आहे. मुंबईपाठोपाठ कोलकाता आणि बेंगळुरू या शहरांचा क्रमांक लागतो.. मानसोपचाराची गरज असलेल्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल आघाडीवर असून, महाराष्ट्र दुसऱ्या तर, कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालं आहे. आरोग्य मंत्रालयाने केलेल्या पाहणीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांना नैराश्याने ग्रासल्याचे दिसून आले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने हे सर्वेक्षण केले आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. चिंतेची बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनाही मानसोपचाराची गरज असल्याचे जे. जे. रुग्णालयाच्या मानसशास्त्र विभागाने अहवालात नमूद केले आहे. पूर्वी वयस्कर लोकांमध्ये मनोविकारांची लक्षणे आढळत होते, आता हे प्रमाण तरुणांमध्ये वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तरुणांमध्ये मनोविकाराबाबतची जागृती करणे गरजेचे आहे.
वाढीला लागलेले आजार:
सेल्फायटिस : अनेक तरुण-तरुणींना दिवसांतून कित्येक वेळा सेल्फी काढून त्या सोशल साइटवर पोस्ट करण्याची सवयच लागलेली आहे मात्र, ही सवय कदाचित मानसिक आजाराची लक्षणेही असू शकतात. मनोवैज्ञानिकांच्या भाषेत याला सेल्फायटिस असे म्हटले जाते.
– ऑनलाइन गेम एडिक्शन
– सायबर बुलिंग
– फेसबुक डिप्रेशन
– बॉडी इमेज इश्यू
– नैराश्य
– सायकोसिस,
– बायपोलर डिसॉर्डर,
– डिमेन्शिया
– ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसॉर्डर (ओसीडी)
– अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसॉर्डर (एडीएचडी)
– डिमेन्शिया
मानसिक आजाराची कारणे:
सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रिया यामुळेही लोकांच्या मानसिकतेवर आघात होत आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजार निर्माण झाले आहेत.
– फेसबुकमुळे येणारा तणाव, ऑनलाइन गेमच्या आहारी जाण्याचे दुष्परिणाम.
– ऑनलाइन गेम खेळताना येणारा ताण.
– सायबर बुलिंग : सोशल मीडियावर सर्फिंग करत असताना इतरांकडून मिळणारी वाईट वागणूक. लोकांकडून होणारा उपहास , शारीरिक व्यंगावर होणारी टिप्पणी.