मुख्याधिकाऱ्यांचे कार्यतत्पर असल्याचे प्रत्यंतर : शैलेशभाऊ सोनार यांच्या तक्रारीला मुख्याधिकारी यांचा तात्काळ प्रतिसाद
श्री. राजन चौक, पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी, धुळे, दोंडाईचा- येथील आझाद चौकमधील नगरपालीकेच्या नऊ नंबर शाळेत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री शैलेशभाऊ सोनार यांनी परिसरातील गोर-गरिब, सुशिक्षित किशोरवयीन व बालतरूण मुलांसाठी जेसीबी लावून साफसफाई करत सुंदर वातावरणात मोकळ्या पटांगणात व्यायामशाळा सुरू केली आहे. ह्या तरूणाभिमुख मागणीची दखल दोंडाईचा नगरपालीकेचे मुख्याधिकारी श्री देवेद्रसिंग परदेशी यांनी तात्काळ घेत, आरोग्य विभागासह फौजफाटा उभा करत, चांगल्या कामात खारीचा वाटा उचलला आहे.
येथील आझाद चौकात अनेक वर्षांपासून नगरपालीकेच्या नऊ नंबर शाळेच्या काही भागात अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य वाढत होते. अनेक मुले ह्या शाळेच्या पटांगणावर क्रिकेट खेळत असत. मात्र घाण वाढत होती, त्यामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील रहिवासी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत होते, म्हणून येथील किशोरवयीन व बालतरूणांनी ही व्यथा आझाद चौकात नेहमी सामाजिक कामात पुढाकार घेणारे शिवसेनेचे श्री शैलेशभाऊ सोनार यांना सांगितले व येथे साफसफाई सोबत व्यायाम शाळा सुरू करण्याचे सुचविले. त्यांनी दोंडाईचा नगरपालीकेचे मुख्याधिकारी श्री देवेद्रसिंग परदेशी यांना त्याबद्दल तक्रार करताच, नऊ नंबर शाळेच्या काही खोल्या व आजुबाजूच्या परिसरात जेसीबीने स्वच्छता करून दिली, आरोग्य विभागाचा फौजफाटा उपलब्ध करून साफसफाई करत शाळेच्या आवारात सुंदर वातावरण निर्माण करून दिले. याठिकाणी वार्डातील मुलांनी स्वखर्चाने व्यायामाचे साहित्य उपलब्ध केले आहे व एंकदरीत घराजवळच वार्डात-शाळेत व्यायाम शाळा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्याचा फायदा होणार आहेच. नगरपालिका मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी अजय माणिक व कर्मचारी विभाग,जेसीबी चालक कुष्णाभाऊ व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री शैलेशभाऊ सोनार यांनि यात सामाजिक बांधिलकी ठेवून कार्यतत्परता दाखवली म्हणून सर्वत्र मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांचे यांचे कौतुक होत आहे.