जगात कुठेही पोहोचा 2 तासांत : नासाचे X-59 लवकरच करणार उड्डाण
पोलीस डायरी, कॉनकोर्ड हे सुपरसॉनिक विमान बंद झाल्यानंतर, जवळपास 20 वर्षांनी त्याचे नवे स्वरूप येणार आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने या विमानाला एक्स-59 असे नाव दिले आहे. कॉनकोर्डपेक्षा त्याचा वेग कमी असेल. नासाचे तज्ज्ञ असे विमान बनविण्याच्या तयारीत आहेत, जे अवघ्या दोन तासांत जगाच्या कोणत्याही कोनाकोपऱ्यात पोहोचेल. नासाचे एक्स-59 लवकरच पहिले उड्डाण करणार आहे. ते कॉनकोर्डपेक्षा लहान असेल. मात्र, त्याचा वेग ताशी 1,500 किलोमीटर असेल. यामुळे न्यूयॉर्क ते लंडन हा प्रवास सुमारे 3.30 तासांनी कमी होईल.
तज्ज्ञ तयार करत असलेल्या या सबऑर्बिटल फ्लाइटचा वेग 5,632 किमी प्रति तास असेल. या विमानाद्वारे पृथ्वीवर कोठेही 2 तासांत पोहोचता येईल. हे विमान जेफ बेझोस यांच्या व्हर्जिन गॅलेक्टिक जेट प्रोग्रामच्या रॉकेटसारखे आहे. या विमानातून न्यूयॉर्क ते शांघाय हे अंतर केवळ 39 मिनिटांत पूर्ण होईल. सध्या याला 15 तास लागतात. कॉनकोर्ड हे जगातील पहिले सुपरसॉनिक विमान प्रचंड वेग घेत असे, न्यूयॉर्क ते लंडन हे अंतर तीन तासांपेक्षा कमी वेळात कापत,ताशी 2,172 किलोमीटर वेगाने उडत होते. 2000 मध्ये एका हायप्रोफाइल अपघातानंतर हे विमान बंद करण्यात आले होते
प्रवासाचा वेग अनेक पटींनी वाढविण्याचे प्रयोग केले जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास, सिडनी आणि लंडन (16,996 किलोमीटर) दरम्यानचा प्रवास सध्या जो 22 तासांचा आहे, तो केवळ दोन तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आहे.