धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोर्चे बांधणी सुरु
श्री राजन चौक, पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी, धुळे, आज दिनांक २८/७/२०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे जिल्हा निरीक्षक श्री उमेश दादा पाटील साहेबांनी धुळे जिल्हा निरीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारित असताना राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी आमदार श्री.अनिल आण्णासाहेब गोटे यांचे आशिर्वाद तसेच सर्व प्रमुख पदाधिका-यांची भेंट घेऊन विचार जाणुन घेतले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री श्री जयंतराव पाटील साहेब यांच्या मान्यतेने श्री उमेश दादा पाटील यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेत पक्ष श्रेष्ठींपर्यंत त्यासंबंधी विचारविनिमय करून योग्य तो न्याय देण्यासंबंधी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयास भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष श्री माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांनी उमेश दादा पाटील तथा ग्रंंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक सौ.रीता ताई बाविस्कर यांचे स्वागत केले. तसेच माननीय श्री अनिल गोटे साहेब यांनी येणाऱ्या काळामध्ये पक्ष आदेशानुसार विविध कामकाजा संबंधी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचित केले.या बैठकीमध्ये उपस्थित डॉक्टर अनिल पाटील सर, विजय भाऊ वाघ, प्रशांत दादा पाटील,जमीर शेख,राजेंद्र दादा वाळके,प्रकाश जाधव तसेच विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले तसेच माननीय संपर्कप्रमुख श्री उमेश दादा पाटील यांनी सर्वात आधी माननीय श्री गोटे साहेबांच्या पक्ष शिस्तीबद्दल त्यांचे कौतुक केले व सद्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सोडून गेलेल्या कावळ्यां बद्दल विचार न करता येणाऱ्या काळामध्ये आज पक्ष सोबत असलेल्या तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासंबंधी आश्वासित केले तसेच इथून पुढे कुठलीही पक्षाची बैठक व कार्यक्रम आपल्या राष्ट्रवादी कार्यालय येथेच होईल असे देखील निक्षुन सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्ष शोभाताई आखाडे,प्रदेश सरचिटणीस छायाताई सोमवंशी, धुळे ग्रामीण अध्यक्ष उषाताई पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे ग्रामीण कार्याध्यक्ष श्री प्रशांत भाऊ भदाणे, विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्ष श्री विजय भाऊ वाघ, डॉक्टर सेल प्रदेशचे सचिव डॉक्टर अनिल पाटील सर, धुळे ग्रामीण अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग सलीम भाई शेख, शहराध्यक्ष जमीर भाई शेख, नगरसेवक अब्दुल लतीफ अन्सारी, कार्यालय प्रमुख तथा ज्येष्ठ अकबर अली सय्यद सर, राजेंद्र दादा वाकळे, शकील भाई खजुरवाले ,बाळासाहेब शेंडगे, वामन तात्या मोहिते, भोला भाऊ गोसावी, प्रशांत वाकळे, जावेद किराणावाले, नाना पाठक, सौ गायत्री ताई पाटील,ज्योती ताई चौधरी, प्रकाश भाऊ जाधव, वाल्मीक बापू साळुंखे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती कार्यालय प्रमुख अकबर अली सय्यद सर यांनी दिली व अविनाश भाऊ लोकरे प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख धुळे शहर कार्यकारणी यांनी प्रसिद्ध केली