पो. डा. वार्ताहर , पुणे : नुकत्याच पुण्यात घडलेल्या मुलीवरील हल्ल्याप्रकरणी ज्या तरूणांनी जीवावर उदार होऊन त्या मुलीचे प्राण वाचवले असे हर्षद पाटील व लेशपाल जवळगे यांचा सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुणेरी पगडी व शाल देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक राजसाहेबांनी केले व भविष्यात कोणत्याही मदतीस उपलब्ध आहे असे आश्वासित केले. त्याचप्रमाणे अमितसाहेब ठाकरे यांनी देखील या तरूणांचा चिंचवड येथे सन्मान केला.
सन्मा.राजसाहेब ठाकरे यांना भेटण्याचे स्वप्न यानिम्मित्ताने पूर्ण झाले व त्यांनी मायेने गालावरून जो हात फिरवला तो आयुष्यभर लक्षात राहिल असे या तरूणांनी सांगितले .
मनसेचे नेते अनिल शिदोरे , राजेंद्र वागस्कर शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मनसे सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे तसेच सारंग सराफ व शशांक अमराळे यांनी ही भेट घडवून आणली .