प्रिय लेशपाल आणि हर्षद,
मित्रानो खूप खूप अभिनंदन!!💐💐👌👌
दिल्ली मध्ये तरूणीवर सपासप वार होत असताना अगदी निर्लज्ज तटस्थपणे लोक पहात जात होते.एक समाज म्हणून सोडाच, पण एक माणूस म्हणून तरी आपण जिवंत आहोत का ? हा प्रश्न पडावा इतक्या मुर्दाडपणाचे ते कृत्य होते.भविष्यात मुलीबाळींवर अगदी दिवसाढवळ्या कांही संकट आले तरी देवच वाली अशी परिस्थिती सर्वसामान्य पालकांना वाटू लागली होती.. तसाच प्रयत्न ईथे झाला आणि या महाराष्ट्राच वेगळेपण तुम्ही दाखवून दिले.
मनात सूडाचे विकृत विचार आणि हातात कोयत्या सारखे घातक हत्यार असणाऱ्या त्या नराधमास स्वतः निशस्त्र असताना कोणताही वेळ न दवडता हिमतीने भिडलात आणि त्या मुलीचे प्राण वाचवले.महाराष्ट्राचे वेगळेपण सगळ्या देशाला दाखवून दिलं.हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, इथ आयाबहिणींवर हात टाकणारा कोणीही आणि कसाही असो त्याला इथला मावळा भिडणार हे जगाला समजलं.छत्रपतींचा वारसा जात,धर्म, पंथ,प्रांत किंवा भाषा याआधारे न सांगता महाराजांचे विचार राबवणारे तुमच्यासारखे तरूणच हा वारसा पुढे चालवणार यात शंका नाही.
लेशपाल,या घटनेनंतर तुझ्या संयत प्रतिक्रियेने तुझ्यातील वैचारिक परिपक्वतेची साक्ष दिली.
अरे, एका रुग्णाला दोन केळी देताना चौघांचा फोटो काढून सोशल मिडीयावर टाकायचे युग हे!!
तिथं एवढा मोठा पराक्रम करून तुम्ही लोक ती आमची बहीणच आहे आणि आम्ही फार कांही विशेष केले नाही अस बोललात. कमाल आहे तुमची!!
त्यावर ही कळस म्हणजे कोणीतरी त्या मुलाची आणि मुलीची जात विचारल्यावर तुम्ही टाकलेली पोष्ट!!मेंदूच्या सडकेपणावर प्रहार करून सुधारायचा सल्ला दिलात..खरच आपण जितके जास्त सुशिक्षित झालोय तितकाच मनाचा कोतेपणा वाढत चाललाय.
खून, बलात्कार, विनयभंग यासारख्या गुन्ह्य़ात सुद्धा आम्हाला भूमिका ठरवताना दोन्हीकडच्या जाती हव्यात.अशा लोकांना तडाखा देऊन हा महाराष्ट्र पुरोगामी असल्याचा,ही नवीन तरूण पिढी जातीपातीच्या पुढे चालल्याचा दाखलाच तुम्ही दिलाय..
तुम्ही प्रशासनात येऊ ईच्छित आहात आणि त्यासाठी प्रयत्न करीत असल्याच समजले..असे तरूण कोणत्याही प्रशासनाचे भूषणच ठरणार यात शंका नाही.पण ज्या निर्भयतेने भिडायची हिम्मत तुम्ही दाखवलीत त्यावरून तुम्ही पोलीस प्रशासनात आलात तर तुमच स्वागत करायला खूप आवडेल. हे मी 25 वर्ष पोलीस खात्यात काम केलेला एक वरीष्ठ अधिकारी म्हणून सांगतो..
महाराष्ट्राचा नावलौकिक राखल्याबद्दल किंबहुना त्यात भर घातल्याबद्दल पुनश्च अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!…💐💐🙏🙏
संदीप दिवाण, IPS
***सदरचे पत्र हे त्यांनी त्यांच्या social media हॅन्डल वरून प्रदर्शित केले आहे ***