काँग्रेसच्या उम्मेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची धुळे आणि नंदुरबार येथे जाहीर सभा
पोलीस डायरी, राजन चौक, जिल्हा प्रतिनिधी: धुळे : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेमुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील मतदारांत काँग्रेस बद्दल पूरक वातावरण तयार होत आहे. प्रियंका गांधी यांची शनिवारी नंदुरबारमध्ये जाहीर सभा होती. त्यांच्या नंदुरबारमध्ये आगमनापूर्वीच लाखोंच्या संख्येने जनसमुदाय सभास्थळी उपस्थित होता. प्रियंका गांधी यांचे आगमनावेळी जोरदार घोषणाबाजीने त्यांचे स्वागत नंदुरबारच्या जनतेने केले. मोदींच्या सभेमध्ये उपस्थित जनसमुदायापेक्षा मोठ्या संख्येने जनसमुदाय प्रियंका गांधी यांच्या सभेला उपस्थित झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या मताधिक्क्याविषयी भीतीचे वातावरण दिसत आहे. राजकीय विश्लेषकांच्या अनुमानानुसार, प्रियंका गांधीच्या नंदुरबारमधील जाहीर सभेचा परिणाम संपूर्ण खानदेशात पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे शनिवारी सकाळी गोंदूर विमानतळावर आगमन झाले. त्यांचे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ.अश्विनीताई कुणाल पाटील यांनी स्वागत केले. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीचा हाल हवाल जाणून घेतला. नंदुरबार लोकसभेतील इंडिया आघाडीचे उमेदवार अॅड.गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेचे नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले होते, या सभेनिमित्ताने खाजगी विमानाने धुळे येथे गोंदूर विमानतळावर आगमन झाले.
दरम्यान, नंदुरबार येथील सभा आटोपून आल्यावर त्यांनी धुळे लोकसभेतील मतदारांना आवाहन करतांना सांगितले कि, सेवा आणि समर्पण भावनेतून जनतेसाठी काम करणार्या इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी लोकसभेत इंडिया आघाडीच्या उमेवारांना विजयी करण्याचे जनतेला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियका गांधी यांनी आवाहन केले.
यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष डॉ.अनिल भामरे, महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस युवराज करनकाळ, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, उमेदवार प्रतिनिधी डॉ. मयुरी बच्छाव, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव राहूल माणिक, बापू खैरनार, विजय चिंचोले, डॉ. ममताताई पाटील, डॉ. शैलेंद्र पाटील, बानुबाई शिरसाठ, भावना गिरासे, दीपक अहिरे, भैय्या चौधरी, राजेंद्र देवरे, प्रकाश पाटील, प्रमोद सिसोदे, अलोक रघुवंशी, नरेंद्र पाटील, प्रशांत पदमोर, छाया पवार, तुषार गर्दे आदी उपस्थित होते.
प्रियंका गांधी यांचे नंदुरबार येथील सभेतील क्षण
नंदुरबार : राहुल गांधी एक असा नेता आहे ज्याने कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत चार हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला. मणिपूरमध्ये झालेल्या घटनेच्या बाबतीत नरेंद्र मोदीसह त्यांचे एकही मंत्री संसदेत बोलू शकले नाहीत. मणिपूरातील घटना रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शहा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कुठलेही पाऊल उचलले नाहीत म्हणून मोठी घटना घडली. एकमेव आदिवासी मंत्री हेमंत सरेन यांना देखील मोदी सरकारने जेलमध्ये टाकले आहे. हा एक प्रकारे आदिवासींवर अन्यायच आहे.
आदिवासींसाठी जीवन समर्पित करणाऱ्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या हस्ते नवीन संसदेचे उद्घाटन न करून त्यांचा अपमानच केला आहे. एकीकडे प्रधानमंत्री म्हणतात आदिवासींच्या सन्मान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तर दुसरीकडे राष्ट्रपती पदासारख्या उच्चं पदावरील आदिवासीचा अपमान अशा प्रकारे केला जात आहे. जो खरंच सन्मान करतो तो राजकीय फायद्यासाठी सन्मान करत नाही, नरेंद्र मोदी फक्त राजकीय फायद्यासाठी सन्मान करत आहे.
महाराष्ट्रात सुमारे दोन लाख आदिवासींना वनपट्टे दिले गेले नाहीत. हा काय आदिवासींच्या सन्मान आहे? कालच्या नरेंद्र मोदींच्या सभेचे उदाहरण देत ते म्हणाले, मी शबरीचा पुजारी आहे, मग मणिपुरातील शबरीचा आपमान झाला तेव्हा मोदीजी चूप का होते? कुठे भगवान रामाची शबरी आणि कुठे नरेंद्र मोदींची खोटी आश्वासने !!
नरेंद्र मोदी म्हणतात, मी एकटा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. सत्ता त्यांच्याच पक्षाचीअसताना तरी मोदी एकटे कसे ?? सवाल प्रियंका गांधी यांनी सभेत उपस्थित केला.
महागाईमुळे आजच्या महिलेला घर चालविताना समस्या होत आहे, घरातील बजेट हालल्याने मुलांचे शिक्षण देखील अपूर्ण ठेवण्याची पाळी येत आहे. ही गोष्ट नरेंद्र मोदी समजू शकतात का?, असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला.
गेल्या निवडणुकीत त्यांनी दिलेली आश्वासने फोल ठरत आहेत, देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर काळ्याधनाचे 15 लाख येतील. दोन करोड रोजगार उपलब्ध करून देऊ, मोदींचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले का ? नरेंद्र मोदींनी काय केले महाराष्ट्रात, आमदारांना फोडून सत्ता स्थापन केली तर हा काय मतदारांच्या निर्णयाचा सन्मान आहे का?
काँग्रेसने काहीच केले नाही, असे म्हणणारे आज देश विकत आहेत, हे काँग्रेसच्या कार्यकाळातील केलेल्या विकासकामांचेच आहे. करोडपती उद्योजकांचेच कर्ज फक्त माफ होत आहेत आणि शेतकऱ्यांचा अपमान केल्या जात आहे, काँग्रेसने प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फक्त खोटी आश्वासन देत आहेत असेही त्या म्हणाल्या.