धुळे लोकसभा निवडणूक :माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी –
पोलीस डायरी, राजन चौक, जिल्हा प्रतिनिनिधी, : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेच्या अधीकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या समर्थनार्थ दिनांक ११ मे २०२४ रोजी रात्री ८:३० वाजता मौलवीगंज धुळे येथे लोकसंग्राम व महाविकास आघाडीच्या संयुक्त विद्यमानातून जाहीर कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वेळ कमी असल्याकारणाने संबोधित करणाऱ्या सर्वच मान्यवरांनी येणाऱ्या २० तारखेला पंजा या चीन्हा समोरील बटन क्रमांक – २ दाबून काँग्रेस पक्ष व महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.सौ. शोभा दिनेश बच्छाव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले. या प्रसंगी शकील शाहीन यांनी सुरुवातीलाच भाजपाच्या मुस्लिम तूष्टीकरणाविषयी व लोकसभेच्या निवडणुकांवेळी जाती-धर्मांमधील तेढ निर्माण करण्या विषयाची वक्तव्य व देशाच्या अखंडतेला बाधा आणण्या संबंधी आपले विचार मांडले. त्या नंतर मीरा भाईंदर येथील माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी मोदी- शहा यांच्या खोटारडेपणाचा लेखाजोखाच सर्वांसमोर मांडला. तसेच पुढे महाराष्ट्राचे काँग्रेसचे माजी मंत्री अनिस अहमद साहेब यांनी यावेळी आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे का उभे राहावे यासंबंधी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी घेतल्या गेलेल्या सर्वंकष विकासाच्या मुद्द्यांची आठवण करून दिली. तसेच त्यांनी स्वतः अंबानी यांच्या विरोधात केलेल्या कारवाई विषयी माहिती देत आता व या आधी जे देशाच्या अर्थव्यवस्थेला पोखरण्याचे काम करीत होते अशाच शक्तींच्या विरोधात आम्ही कालही विरोधात होतो आणि आजही विरोधातच आहोत याची जाणीव करून दिली. त्या नंतर सर्वात शेवटी लोकसंग्राम चे सर्वेसर्वा माजी आमदार अनिल अण्णा गोटे हे विचार मांडण्यासाठी उभे राहताच व मी पुन्हा एकदा वापस आलो आहे ते भामट्याचे हजामत करण्यासाठी असे वाक्य बोलताच टाळ्यांच्या कडकडात, शिट्या वाजवत उपस्थितांनी दाद दिली. जीना यहां-मरणा यहां इसके सिवा जाना कहा. व दो आखे बारा हात फिल्म मधील सय्या झुठो का बडा सरताज निकला.. अशीच सध्या देशाच्या राज्यकर्त्यांची परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील टरबूज, पिस्तुल्या यांचे नामकरण स्वतः केल्याचे देखील निक्षुन सांगितले तसेच मागील काही वर्षात भाजपच्या या जोडगोळीने सबंध महाराष्ट्र भ्रष्टाचाराने लुटून खाल्ला असल्याचे सांगताना शहरातील यांनी बनवलेल्या सिमेंटच्या रस्त्यांमध्ये सिमेंट सोडून सर्व काही असल्याचे पुरावे देत याच भ्रष्टाचाराने कमावलेल्या पैशांचा येणाऱ्या निवडणुकीत महापूरच येणार असल्याचे सांगताना आपण सर्वांनी मात्र कुठल्याही आमिषाला बळी न पडण्याचे जाहीर आव्हान केले. आणि सध्याच्या सत्तेतील कारभाऱ्यांनी ज्या ज्या भ्रष्टाचारींवर आरोप लावले त्या सर्वांना आपल्याच पक्षात घेऊन लुटारूंची टोळीच तयार केली असल्याचे चित्र सर्वदुर दिसत आहे. आणि अशाच कारणांमुळे मी माझ्या स्वतःच्या आमदारकीचा मागे एक वर्षा आधीच राजीनामा का दिला याबद्दल देखील खुलासेवार पणे सांगितले व या देशात आपल्या सर्वांना राहायचे असेल तर जाती-धर्मातील तेढ बाजूला करीत एकसंधपणे राहावे लागेल. आणि सर्वांना सोबत घेऊनच येणाऱ्या काळात विकासाचे कार्य पूर्ण होऊ शकते. आणि हे कार्य फक्त आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच शक्य आहे असे संगतांना भाषणाच्या शेवटी अबकी बार.. भामट्या हद्दपार.. तडीपार..च्या घोषणेने भाषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी महाविकास आघाडीतील अनीस अहमद (माजी मंत्री), मुजफ्फर हुसैन-आमदार मिरा भाईंदर , साबिर सेठ, सलाम मास्टर, शकील शाहीन, गोपाल अंसारी, मुजफ्फर भैय्या, रमेश श्रीखंडे,नवाब बेग मिर्जा, महेश भाऊ मिस्त्री,आमीन पटेल, लल्लू सेठ,वसीम मंत्री, तेजस आप्पा गोटे,आलोक रघुवंशी, जमीर शैख,गुड्डू काकर, सलीम शाह, सलीम लंबू, अकबर अली सर, आबिद मनियार, जाविद किरानावाले, प्रशांत भदाने, विजय वाघ, डॉ अनिल पाटील, मुख्तार मंसूरी,हसन पठान,पप्पू मुल्ला,अफसर पठान,सोमनाथ चौधरी,वामन मोहिते, प्रकाश जाधव, मांगीलाल भाऊ, अविनाश लोकरे, नाना पाठक,चिलु आवळकंठे, छोटू गवळी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मौलवीगंज धुळे शहरातील कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती लोकसंग्राम व महाविकास आघाडीच्या आयोजकांच्या वतीने देण्यात आली.