कृषि निविष्ठा : तक्रार निवारण व सनियंत्रण कक्ष स्थापन
पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जिल्हा प्रतिनिधी,वाशिम,: खरीप हंगाम लवकरच सुरू होणार आहे. शेतकऱ्यांच्या कामांची लगबग दिसून येते आहे. कृषि सेवा केंद्रावर बियाणे खरेदी,रासायनिक खत खरेदी, कीटकनाशक खरेदी या करिता शेतकऱ्यांची कुठलीही फसवणूक होऊ नये तसेच शेतकऱ्यांना कृषि निविष्ठाच्या गुणवत्ता व किंमतीबाबत तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषि केंद्रावरून कृषि निविष्ठा घ्याव्यात व कुठलीही फसवणूक होत असेल तर जिल्हास्तरावर सी.पी. भागडे मोहीम अधिकारी ८८०५८१०५१८, जि. एस. चिंतावार वि. अ. (कृषि) ९०११५५५३९४ यांच्याशी संपर्क करावा. तसेच तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी व कृषि अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांनी केले आहे.