इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे काम प्रशंसनीय – जिल्हाधिकारी विनय गौडा
पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर,: इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक रेड क्रॉस दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. तर प्रमुख अतिथी म्हणून शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमए चे अध्यक्ष डॉ. संजय घाटे, सचिव डॉ. प्रवीण पंत, डॉ. बी. एच. दाभेरे, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. राजीव देवईकर, डॉ. दुधीवार, प्राचार्य पुष्पा पोळे, अश्विनी खोब्रागडे, अँड प्रिती शहा उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सामाजिक , आरोग्य, राष्ट्रीय लसीकरण व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून जनसेवेचे काम उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे. तसेच नुकतेच इंडियन रेड क्रॉस सोसायटीला शासनाकडून संमत झालेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीला देखील लाभ पोहचविण्याचे आवाहन इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सदस्यांनी केले.
प्रास्ताविकात डॉ. मंगेश गुलवाडे यांनी रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून सुरू असलेले रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर, प्राथमिक उपचार प्रशिक्षण, साप्ताहिक ज्येष्ठ नागरिकांसाठी नि:शुल्क आरोग्य सेवा व ना नफा ना तोटा तत्त्वावर आधारित जेनेरिक मेडिकल स्टोअर आदी विषयांवर जनजागृती कार्यक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमात डॉ. कल्पना गुलवाडे यांनी उष्माघातबद्दल घ्यावयाची काळजी व माहिती याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. मिलिंद कांबळे,डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. संजय घाटे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावाडे व रागिनी सिस्टर यांनी तर आभार पियुष मेश्राम यांनी मानले. यावेळी सुभाष मुरस्कर, आरिफ भाई, रुपेश ताकसांडे, आशिष गिरडकर व परिचारिका वस्तीगृहातील कर्मचारी उपस्थित होते.