जिल्हाधिका-यांकडून स्विमींग पुल व बॅडमिंटन हॉलची पाहणी
पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर, : जिल्हा क्रीडा संकूल, चंद्रपूर येथे अद्यावतीकरण करण्यात येत असलेल्या स्विमींग पुल आणि बॅडमिंटन हॉलच्या बांधकामाची मंगळवारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलातील अत्याधुनिक बॅडमिंटन हॉल करिता जिल्हा नियोजन समितीमधून 5 कोटी 39 लक्ष रूपये इतका निधी प्राप्त झाला आहे. बॅडमिंटन हॉलचे बांधकाम एका महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच जलतरण तलावाकरिता नाविन्यपूर्ण योजनेमधून सन 2022- 23 मध्ये 1 कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्या निधीतून जलतरण तलाव अद्यावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील असंख्य जलतरणपटू सराव करण्यास आतुर आहेत. गुरुवार दिनांक 9 मे पासून स्विमींग पुल येथे उन्हाळी शिबिराची (समर कॅम्प) सुरवात होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्विमींग करीता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे