अधिनस्त कर्मचाऱ्यांचे मतदान झाल्याबाबत खातरजमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात दि.१३ रोजी मतदान होणार असून या दिवशी आपापल्या अधिनस्त कर्मचारी अधिकारी यांनी मतदान केले की नाही, याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी खातरजमा करुन तसा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावा,असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज निर्गमित केले आहे. सर्व विभागप्रमुखांना दिलेल्या या आदेशात म्हटले आहे की, दि.११ व १२ मे रोजी सुटी आहे व दि.१३ मे रोजी मतदान आहे. त्यामुळे दि. १३ रोजी अधिनस्त कर्मचारी, अधिकारी मुख्यालयी राहण्याबाबत अथवा त्यांचे ज्या ठिकाणी मतदान आहे त्याठिकाणी जाऊन मतदान करण्याबाबत निर्देशीत करावे. दि.१४ रोजी त्यांनी मतदान केले की नाही याची बोटाची शाई तपासून खातरजमा करावी व तसा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयास कळवावा.