वयोवृद्ध, दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था: इलेक्शनसाठी प्रशासन सज्ज
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी येणे व जाणे दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना सोईचे व्हावे यासाठी विनामूल्य वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. १०९ औरंगाबाद (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविल्यानुसार मोहल्ला १) किरादपूरा- राममंदिर, २) शहागंज – हिंदी विद्यालय, ३) नारेगाव पेट्रोलपंप, ४)गारखेडा सुतगिरणी चौक, ५) सिडको एन ६ चौक चिस्तीया कॉलनी रोड या पाच ठिकाणी ही वाहने दि.१३ रोजी सकाळी सात ते सायं. साडेपाच वा. पर्यंत उपलब्ध करण्यात आले आहे. या वाहन सेवेचा लाभ घेण्यासाठी मतदारांनी सक्षम ॲप वर जाऊन वाहना करीता नाव नोंदणी करावयाची आहे. ही नावनोंदणी दि.११ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत करता येणार आहे. तरी मतदारांनी आपली नाव नोंदणी करावी,असे आवाहन सहा. निवडणूक निर्णय अधिकारी १०९- औरंगाबाद (पुर्व) विधानसभा मतदार संघ यांनी केले आहे.