टपाली मतदानाचे मतदान केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर १० लोकसभामतदार संघातील कर्मचाऱ्यांनी ज्यांची नियुक्ती मतदाना संदर्भातील कामकाजासाठी झालेली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांचे मतपत्रिका पाकीट जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले आहे. तरी या अधिकारी- कर्मचारी यांनी टपाली मतपत्रिका कक्ष येथे सकाळी ९ ते सायं.६ दरम्यान येऊन टपाली मतदान करावे असे आवाहन करण्यात आले हे. तसेच जिल्ह्यात कार्यरत पोलीस अधिकारी कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड तसेच १८- जालना लोकसभा मतदार संघातील पोलीस अधिकारी कर्मचारी ज्यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे त्यांनी फॉर्म नं. १२ भरुन दिलेला असल्यास त्याची अनुज्ञेयता तपासून पात्र ठरलेले अधिकारी- कर्मचारी टपाली मतदान करण्यासाठी टपाली मतपत्रिका कक्षात दि.८ ते दि.१२ या दरम्यान सकाळी ९ ते सायं.६ वा. पर्यंत येऊन आपले मतदान करावे,असे आवाहन करण्यात आले असल्याचे टपाली मतदान नोडल अधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.