१०८-औरंगाबाद (पश्चिम) दुसरे प्रशिक्षण लोकशाही संवर्धनाच्या कर्तव्यास आत्मविश्वासाने सामोरे जा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील १०८-औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आज पार पडले. वंदे मातरम सभागृहात आज या प्रशिक्षण सत्रास निवडणूक निरीक्षक कांतिलाल दांडे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच प्रशिक्षणात सहभागी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केले.
आतापर्यंत घेतलेले प्रशिक्षण, त्यातून मिळालेली माहिती, झालेला अभ्यास यामुळे आपण सर्व निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित पार पडेल असा मला विश्वास आहे. निवडणुकीचे कामकाज हे लोकशाही संवर्धनाचे कर्तव्य असून या कर्तव्यास आत्मविश्वासाने सामोरे जावे,अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी प्रशिक्षणात सहभागी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले.
येथील वंदेमातरम सभागृहात आज १०८-औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा क्षेत्राचे प्रशिक्षण आज पार पडले. उमेदवार संख्या वाढल्याने तीन मतदान यंत्रांची आवश्यकता असल्याने तीन यंत्रांची जोडणी या प्रक्रियेचाही प्रशिक्षणात प्रात्यक्षिकासह समावेश करण्यात आला आहे. या प्रशिक्षणात मतदान केंद्र अधिकारी, सहाय्यक अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात १०८ औरंगाबाद(पश्चिम) या विधानसभा मतदार संघाकडे वर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. सकाळच्या सत्रात ५६४ तर दुपारच्या सत्रात १०१८ कर्मचारी सहभागी झाले.