पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा सन 2023-24 चे आयोजन जिजामाता क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत 23 लाख रूपयांचे बक्षीसे देण्यात येणार आहे.
स्पर्धेत एकूण 500 पदक, 32संघ, 8 विभाग सहभागी होत आहे. राज्य व्हॉलीबॉल संघटना, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने श्री शिवछत्रपती व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. 22 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. स्पर्धेमध्ये राज्यामधील आठ विभागाचे 19 व 21 वर्षाखालील मुले व मुली सहभागी झाले आहे.
स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज चषक प्रतिकृतीसह रोख बक्षीस देण्यात येणार आहेत. यात 21 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक 20 हजार रूपये, 21 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक 20 हजार रूपये, 18 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक 20 हजार रूपये, 18 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक 20 हजार रूपये, 21 वर्षाखालील मुले द्वितीय क्रमांक.15 हजार रूपये, 21 वर्षाखालील मुली द्वितीय क्रमांक 15 हजार रूपये, 18 वर्षाखालील मुले द्वितीय क्रमांक 15 हजार रूपये, 18 वर्षाखालील मुली द्वितीय क्रमांक 15 हजार रूपये, 21 वर्षाखालील मुले तृतीय क्रमांक 10 हजार रूपये, 21 वर्षाखालील मुली तृतीय क्रमांक 10 हजार रूपये, तसेच विजयी चमु व खेळाडूंना प्रथम क्रमांक 18 ते 21 वर्षाखालील मुले व मुली 48 सुवर्ण पदके, द्वितीय क्रमांक 18 ते 21 वर्षाखालील मुले व मुली 48 रौप्य पदके, तृतीय क्रमांक 18 ते 21 वर्षाखालील मुले व मुली 48 कांस्य पदके देण्यात येणार आहे.
स्पर्धेत एकूण 23 लाख 36 हजार रूपयांची बक्षीसे देण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 6 ते 10 पर्यंत चालणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन दि. 19 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. स्पर्धेसाठी चार व्हॉलीबॉल कोर्ट तयार करण्यात आले आहे. स्पर्धेकरीता तांत्रिक तज्ज्ञ तालुका क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे, स्पर्धा निरीक्षक म्हणून कॅप्टन अशोक राऊत आहेत.