पो. डा. वार्ताहर, राजुरा, चंद्रपूर :– नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाच्या विविध पदाच्या पात्रता परिक्षेत तालुका क्रीडा संकुल राजुरा येथे विद्यार्थ्यांकडून नियमित सराव घेणाऱ्या श्री. छत्रपती क्रीडा अकॅडमी राजुराच्या १३ विद्यार्थ्यांची राज्य पोलीस विभागात विविध पदांवर निवड झाली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक पाशा शेख सर यांचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे. क्रीडा संकुल राजुरा येथे छत्रपती क्रीडा अकॅडमी राजुराच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यात चंद्रपूर पोलीस चालक पदावर राधिका चंद्रशेखर पिपरे, किशोर काशीनाथ कांबळे, नागपूर पोलीस चालक पदावर वैभव पुरुषोत्तम उपरे, चंद्रपूर पोलीस विभागात प्राजक्ता शंकर निखाडे, वैष्णवी आनंदराव पावडे, हर्षा सुधाकर रोगे, अकोला पोलीस विभागात प्रियंका नायराव घुले यवतमाळ पोलीस विभागात वर्षा पैक आत्राम, तर राज्य पोलीस विभागात विविध ठिकाणी निवड झालेले राहुल विधाते, स्वप्नील भालवे, आचल सरवर, पुजा इंदूरवार, सुवर्णा नाईकवार आदींचा समावेश आहे.
या प्रसंगी पी एस आय ओम कलेगुलवार, रामेश्वर ढवस, पाशा शेख याशिवाय अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.