पोलीस डायरी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर: भारतीय संविधानाचा महत्वाचा भाग म्हणुन मतदानाकडे पहिले जाते. सध्या भारतात लोकसभा निवडणुकांचे पहिल्या टप्प्यातील मतदान आज रोजी होत आहे, चंद्रपुरातील घडामोडींकडे लागेलंय सर्वांचे लक्ष्य. अशातच महाराष्ट्राचे मंत्री म्हणून आपली भूमिका चोख पणे बजावणारे, कार्यकर्त्यांचे जिवाभावाचे सुधीर भाऊ यांनी आज सर्व सामान्य नागरिकांप्रमाणे परिवारासह रांगेत उभे राहून आपले मतदानाचे कर्तव्य आणि हक्क बजावल्याचा वृत्तांत आहे.