पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : मतदानाची टक्केवारी वाढावी, नागरिकांचा मतदानात सहभाग वाढवा या उद्देशाने शासकीय स्तरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्यापैकी महानगरपालिकेद्वारे मतदान करणाऱ्या नागरिकांना मौलाना अब्दुल कलाम आझाद बगीच्या मध्ये मोफत प्रवेश मिळणार असे आवाहन नागरिकांना चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त बिपिन पालीवाल यांनी केले आहे.