पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : रामनवमी निमित्त काळाराम मंदिर येथून रथयात्रा काढण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रथयात्रेचे स्वागत करत प्रभु श्री रामाची पुजा अर्चना केली त्यांनतर रथयात्रेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनिष महाराज व काळाराम मंदिर विश्वस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
देशभरात आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चंद्रपूरातही रामनवमी निमित्त संपुर्ण शहर सजुन निघाले होते. दिवसभरच शहरातील विविध मंदिरात पुजा अर्चना करण्यात आली. तर संध्याकाळी शहरातील मंदिरांमधून शोभायात्रा काढण्यात आल्या. काळाराम मंदिर येथून श्री प्रभु रामचंद्र यांची रथयात्रा काढण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी पुजा केल्या नंतर सदर रथयात्रेला सुरवात झाली. ही रथयात्रा शहराच्या मुख्यमार्गाने होत जटपूरा गेटला वळसा घालुन पून्हा कळाराम मंदिर येथे दाखल झाली या शोभायात्रेत शेकडो रामभक्त सहभागी झाले होते.