पो.डा. वार्ताहर : धनगर समाजाचे दैवत आदर्श राजे मल्हारराव होळकर जयंती निमित्ताने आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे, संस्थापक सचिव कविताताई अभिलाल देवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 17-3-2024 गोताणे येथे व दि. 20/3/2024 रोजी सांजोरी ता. जि. धुळे येथे सेवा हॉस्पिटलचे मोफत सर्व रोगनिदान शिबिर घेण्यात आले, शिबिरात राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी, भुषण पाटील, जुलाल पाटील, अभिलाल दादा देवरे, डॉ.अर्जुन मराठे त्यांचा स्टॉप व गावातील सर्व माता बगिणी ज्येष्ठ, श्रेष्ठ व तरुण मित्र तसेच आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, गावातील लोकांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला. अभिलाल दादा देवरे सांगतात, धुळे व महाराष्ट्रात सन 2021, 22, 23, 24, या चार वर्षापासून सातत्याने कविताताई, अभिलाल दादा देवरे सुट्रेपाडा यांच्या मार्गदर्शनाने सरकारी हॉस्पिटल मध्ये 34,100 पेक्षा जास्त, सेवा हॉस्पिटल मध्ये मध्ये 44,200 पेक्षा जास्त जे जे हॉस्पिटल मुंबई येथे 5,300 पेक्षा जास्त एकूण 83,600, हजार पेक्षा जास्त गोरगरीब रुग्णांचा मोफत उपचार केला गेला आहे. तसेच महिला भगिनींना डिलीवारी साठी व सर्व बालक, तरुण, जेष्ठ याना ऑपरेशन साठी हजारो लोकांना रक्तदान दिले आहेत. अशा प्रकारे गोरगरीब रुग्णांची सेवा कविताताई व अभिलाल दादा देवरे 88 88 94 62 54 करत आहेत. अभिलाल दादा देवरे सांगतात आम्ही आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या वतीने सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्ताने मोफत सर्व रोगनिदान आरोग्य शिबिर संपूर्ण जिल्हाभर घेऊ शकलो. अभिलाल दादा देवरे सांगतात आम्हाला नेहमी साथ देणारे संस्थापक सचिव कविताताई अभिलाल देवरे, महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. नानासाहेब ललितबाबू अहिरे सर, प.महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. वंदनाताई शेंडगे, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रा. देवेन लवटे सर, युवा जिल्हाध्यक्ष अँड संजय हाके सर, युवा जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रो. विद्याताई मारकड, जिल्हा सचिव गणेश गावडे, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रा.विष्णु केसकर सर, उपाध्यक्ष प्रा.रामचंद्र घोडके सर, सांगोला तालुकाध्यक्ष प्रा. हनुमंत श्रीराम सर, साांगली जिल्हाध्यक्ष आशाताई मरळे मॅडम, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष स्वाती वाघमोडे मॅडम, सातारा जिल्हाध्यक्ष प्रा.अर्पिता खरात मॅडम, पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष प्रा. दत्तात्रय भुसारी, मामाश्री – राजधर शिंदे, भुराजी शिंदे, प्रकाश शिंदे, नामदेव शिंदे, भाऊसाहेब शिंदे, शरद शिंदे, धुळे दिवान पाटील, निकुंभे व सुट्रेपाडा गावातील तसेच महाराष्ट्रातील सर्व आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे पदाधिकारी व धुळे सिविल हॉस्पिटलचे डीन डॉ. अरुण मोरे सर, डॉ. सयाजी भामरे सर, अधीक्षक डॉ. अजित पाटीक सर, डॉ. नीता हटकर मॅडम व त्यांचा संपूर्ण स्टॉप, जे जे हॉस्पिटल मुंबई डीन डॉ. पल्लवी साबळे मॅडम व त्यांचा संपूर्ण टॉप तसेच सेवा हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. राजेश अग्रवाल, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. कुणाल मेहता, डॉ. श्रीकांत बामणे, डॉ.अभिजित मोरे, डॉ. अर्जुन मराठे, डॉ. जिनल मॅडम, डॉ. दीपक शर्मा, विजय मगर, डॉ. हेमंत चौधरी, डॉ. धिरज थोरात, डॉ. अनुषा निकुम मॅडम, डॉ. दिपाली पाटील मॅडम, आदर्श मल्हार सेनेचे शहराध्यक्ष मुजम्मिल अन्सारी, सर्वांच्या मदतीने शिबिरात उपचार जनरल तपासणी मेडिसीन ईसीजी, सर्व मोफत तसेच ईसीजी मध्ये जर काय बदल असलं तर गव्हर्नमेंटच्या रोल नुसार ७ ते १० दिवस सर्व उपचार मोफत केला जातो. अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सेवा हॉस्पिटलमध्ये सर्व मोफत केले जातात. आरोग्य सेवक अभिलाल दादा देवरे यांच्या मार्गदर्शनाने सुट्रेपाडा, आनंदखेडा, उडाणे, गोताने, चौगाव, कुंडाणे, सांजोरी, कुसुंबा, नवलाने, निकुंभे, अक्कलपाडा, खंडलाय, विश्वनाथ मोराने, सडगाव, चिंचवार, आर्वी, बल्हाणे, अक्कलाड, बोरवीर, चोपडाई, नेर, असे धुळे ग्रामीणमध्ये सातत्याने सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.