पो.डा. वार्ताहर, जळगाव : मतदारसंघातील राबविलेले विविध उपक्रम त्याचप्रमाणे सर्व स्तरावरील सोशल मीडिया व मतदार संघातील ग्राउंड रिपोर्टच्या आधारावर दिल्लीच्या नामांकित पॉलिटिकल एनालेसिस अँड रिसर्च कमिटीकडून देशातील खासदारांचे मुल्यमापन करण्यात आले.यात जळगाव लोकसभा मतदारसंघाचे देशाचे टॉप टेन खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या कामगिरीला देशात सातवा क्रमांक मिळाला आहे..
खासदार उन्मेशदादा पाटील यांची कामगिरी उंचावली
लोकसभा सचिवालयाने केलेल्या कामकाजांच्या मूल्यांकनाचे आधारावर लोकसभेतील सहभाग, विविध प्रस्तावांवर झालेली चर्चा,मांडलेले प्रश्न या सर्व कामगिरीच्या आधारावर नव्याने निवडून आलेल्या 290 खासदारांपैकी खासदार उन्मेशदादा पाटील यांना देशात दहावा क्रमांकाची कामगिरी केल्याचे लोकसभा सचिवालयाने जाहीर केले होते.
आज पुन्हा दिल्लीच्या पॉलिटिकल एनालेसिस अँड रिसर्च कमिटीने केलेल्या सर्व्हेच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या योजनांची माहिती, अमंलबजावणीसाठी विविध उपक्रम राबवित लोकसभा मतदारसंघातील शेवटच्या घटकांपर्यंत लाभ मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे खासदार उन्मेशदादा पाटील यांची कामगिरी सतत उंचावत राहिली असून हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघ सुरक्षित असून विद्यमान खासदार उन्मेशदादा पाटील यांची दहा पातळीवर झालेल्या सर्व्हे रिपोर्टतून देशात सातव्या क्रमांकावर उंचावली आहे.
कामगिरीचे मूल्यमापन करताना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी घेतलेल्या राजकीय सभा, धार्मिक कार्य, राजकीय सक्रियता ,पंतप्रधान योजनांना, दिलेला प्रोत्साहन त्यासाठी घेतलेले शिबिरे व केलेले प्रयत्न स्थानिक क्षेत्र विकास कामांमध्ये घेतलेल्या आघाडी, सामाजिक कार्यात व त्या कार्यातून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेली धडपड, केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधांची शेवटच्या घटकांपर्यंत केलेली कामे, सामाजिक कार्यक्रमांमधून सभांमधून घेतलेला उत्साहपूर्ण सहभाग, पक्षाचा ध्येय धोरणाचा राजकीय प्रचार प्रसार करताना वेळोवेळी वर्तमानपत्रे इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर मांडलेली भूमिका, त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या योजना असो व राज्य सरकारच्या योजना यांच्या कार्यवाहीमध्ये अधिकाधिकता गती यावी व शेवटच्या घटकांना लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने गतिमान व्हावे.यासाठी घेतलेल्या बैठका अशा दहा घटकांचा विचार करून खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या कामगिरीचा आलेख सतत उंचावत राहील्याने त्यांना देशातील खासदारांच्या तुलनेत सातव्या क्रमांकावर येण्याचा बहुमान प्राप्त झालेला आहे.
सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसारासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे देशाच्या पार्लमेंटरीयल पॉप्युलरिटी इंडेक्स म्हणजे भारतीय संसदपटू लोकप्रियता निर्देशांकांत देशातील खासदारांच्या लोकप्रियेतेत उन्मेशदादा पाटील यांची कामगीरी देशात 7 वी ठरली असून या कामगिरीबद्दल खासदार उन्मेश दादा पाटील यांच्यावर सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.