चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्षाच्या २४व्या “रौप्य महोत्सवी” वर्षा निमित्त पक्षाच्या ध्वजावंदनाचा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य यांच्या हस्ते संपन्न झाला,त्यानंतर पक्षाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड.बाबासाहेब वासाडे यांच्या अध्यक्षतेखाली,जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महीला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके, सेवादल जिल्हाध्यक्ष माणिकराव लोणकर,ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष महादेवराव पिदुरकर,सामजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष जगदीश जुनगरी,नितीन पिंपळशेंडे,ज्येष्ठ नागरीक विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास बहादे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत पक्षाच्या मागील २४ वर्षांच्या प्रगतीच्या वाटचालीवर वक्त्यांनी प्रकाश टाकला, त्याचप्रमाणे आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तसेच नगर परिषदा व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत सुद्ध चर्चा करण्यात आली, बुथ स्थरावर पक्षबांधणी याबाबतही सविस्तर चर्चा झाली.आजच्या कार्यक्रमाला नगरसेविका मंगला आखरे,जिल्हा पदाधिकारी बाबूभाई इसा,सुधाकर कातकर, दिनेश एकवनकर,शरद मानकर,वंदना आवळे,पूजा शेरकी,नंदा शेरकी,प्रमोद देशमुख,किरण साळवी,सरस्वती गावंडे,जाधवताई, अनिताताई माऊलिकर शालिकभाऊ भोयर,इत्यादी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.