आनंदाचा शिधावाटप
बुलडाणा, दि. 17 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सन 2024 मधील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.
वितरीत करावयाच्या “आनंदाचा शिधा” संचात 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात चनाडाळ, रवा, मैदा व पोहा हे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” प्रति शिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच ई पॉस प्रणालीव्दारे शंभर रूपये प्रति संच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे.
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यातील 4 लाख 81 हजार 275 शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात चनाडाळ, रवा, मैदा व पोहा हे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधा जिन्नस संच ई पॉस प्रणालीद्वारे 100 रूपयांत वितरीत करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.