पो.डा. वार्ताहर , नागपूर : जिल्हा माहिती कार्यालयाच्या महानाट्य व महासंस्कृती महोत्सवासाठीच्या चित्ररथाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या चित्ररथाच्या माध्यमातून महानाट्य व महासंस्कृती महोत्सवाची प्रसिद्धी करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून 9 जानेवारीपासून सुरु करण्यात आलेल्या या चित्ररथाला अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.