वाशिम, दि. 09 पो. डा. प्रतिनिधी : जिल्ह्यात एकूण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 19 हजार 351 लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करणे बाकी आहे. प्रलंबित लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
केंद्र शासनाने कोणत्याही अँड्रॉईड मोबाईलवर चेहरा प्रमाणिकरण ॲप्सव्दारे पी. एम. किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रामाणिकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वत:चे ई-केवायसी प्रमाणिकरण तसेच इतर लाभार्थ्यांचे सुध्दा ई-केवायसी प्रमाणिकरण करता येणार आहे.
हे ॲप्स वापरण्याची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे. “PMKISAN GoI” या नावाचे ॲप्स गुगल प्ले – स्टोअरवर उपलब्ध आहे. हे ॲप्स सर्वसाधारणपणे सर्व अँड्रॉईड मोबाईलसाठी वापरता येते. गुगल प्ले स्टोअरमधून मोबाईलवर PMkisan App Install करून घ्यावे. ज्या लाभार्थ्यांच्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये जुने PMkisan App असेल त्यांनी ते PMkisan App काढून टाकावे. व पुन्हा PMkisan App २.०.० हे अप्लिकेशन Install करावे. त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर इंग्रजी व हिंदी या दोन भाषा निवडण्याचा पर्याय दिलेला आहे. त्यापैकी एक पर्याय निवडावा व Submit करावा. समोर दिसणाऱ्या स्क्रीनमध्ये New Farmer Registration आणि Login हे दोन पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी पी.एम. किसान योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांनी Login या बटनावर क्लिक करावे. या ॲप्सच्या वापरासाठी शेतकऱ्याकडे त्यांचा पी.एम. किसान Registration ID किंवा आधार क्रमांक आवश्यक आहे.
स्क्रीनवर दिसणाऱ्या Login Type मध्ये Beneficiary हा पर्याय निवडावा. पी.एम. किसान Registration ID किंवा आधार क्रमांकाच्या आधारे App वर Login करण्यासाठी Get OTP बटनावर क्लिक करावे. पी.एम. किसान योजनेसाठी रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर चारअंकी OTP टाकून Login करावे. त्यानंतर पुढील स्क्रीनवर स्वत:चा सहाअंकी MPIN तयार करावा. या MPIN च्या माध्यमातून लाभार्थ्यास App मध्ये Login करणे तसेच e-KYC करण्यासाठी उपयोग होणार आहे. ज्या Registration ID किंवा आधार क्रमांकावरून App मध्ये Login केले आहे. त्या लाभार्थ्याचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित असेल तर “Your e-KYC is pending for Completion” असा संदेश दिसेल. म्हणजेच त्या लाभार्थ्याची e-KYC प्रलंबित आहे.
समोर दिसणाऱ्या Click here to Complete your e-KYC या लिंकवर क्लिक केल्यावर लाभार्थ्यांनी तयार केलेला सहाअंकी MPIN टाकावा. त्यानंतर समोर दिसणाऱ्या Consent Form वर क्लिक करून Scan Face या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर समोर FaceRD App is not Installed on device असा संदेश दिसल्यास Ok बटनावर क्लिक करावे. त्यानंतर गुगलप्ले स्टोअर Aadhar FaceRD (Early Access) हे App Install करण्यासाठी उपलब्ध होईल ते Install करावे. त्यानंतर मोबाईलमध्ये Capturing Face सुरु होईल. त्यामध्ये दर्शविलेल्या सूचनांचे पालन करून Proceed या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर मोबाईलसमोर धरून चेहऱ्यावर प्रकाश दिसेल अशा पद्धतीने Scan Face या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर Images Captured Successfully processing असा संदेश स्क्रीनवर आल्यानंतर Successful e-KYC असा संदेश दिसेल म्हणजेच लाभार्थ्याचे e-KYC प्रमाणिकरण पूर्ण झालेले आहे. इतर लाभार्थ्यांची e-KYC करावयाची असल्यास Dashboard वरील “e-KYC for other beneficiaries” या बटनावर क्लिक करावे व पुनश्च: वरीलप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया करावी.
अशाप्रकारे e-KYC अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थींना स्व:ताचे e-KYC प्रमाणिकरण तसेच इतर 50 लाभार्थ्यांचे प्रमाणिकरण पूर्ण करता येणार आहे. अशाप्रकारे e-KYC प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना यानंतरचे अनुदान/ हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्डची e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी केले आहे.