वरोरा:
चंद्रपूर -वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी आंबेडकर चौकात सभा पार पडली. वरोऱ्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व व्यापारी संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अखील भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आमदार प्रतिभाताई धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,मानस धानोरकर उपस्थित होते.
लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, रामनवमी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढवस, शिवसेना(ठाकरे गट) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, भारतीय जनता पक्षाचे बाबा भागडे, राष्ट्रवादीचे जयंत टेमुर्डे,माजी जी.प. सभापती प्रकाश मुथा, मनसेचे रमेश राजुरकर, रिपब्लिकन पक्षाचे केशवराव ठमके,शिवसेनेचे आशिष ठेंगणे,काँग्रेसचे विलास टिपले, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, धनोजे कुणबी समाजातर्फे ॲड.गजानन बोढाले, माजी सभापती छोटू शेख,मॉर्निंग वॉक ग्रुप चे सचिव बंडू देऊळकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष पराग पत्तीवार, गांधी उद्यान मंडळाचे नरेंद्र नेमाडे, व्यापारी असोसिएशनचे, योगेश डोंगरवार,ॲड. मधुकर फुलझेले, बाबा आगलावे आदींनी आपल्या भावना या वेळी व्यक्त केल्या.
प्रारंभी सुचेता पद्मावार यांनी श्रध्दांजलीपर गित गायले. सभेचे प्रास्ताविक विलास नेरकर संचालन प्रा. प्रशांत खुळे यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येत गावातील नागरिकांनी उपस्थित होते.