पो. डा. धुळे : –
सदरील कॉलेजमधील ब्लड बँकेत अद्ययावत असलेल्या nac टेस्ट द्वारे रक्ताची चाचणी करण्यात येत नाही. सदरील कॉलेज मध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर ये जा असते. परंतु अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त उपकरणे सदरील कॉलेज मध्ये पाहण्यात आली नाही , तसेच त्या बाबतीच्या माहितीचा देखील अभाव आढळला.
रक्त संक्रमणाशी संबंधित असलेल्या अद्ययावत चाचण्यांच्या नावाचा देखील कर्मचाऱ्यांना लवलेश नसल्याचेही आढळले. रक्त संक्रमण अधिकारी यांच्याशी भ्रमण ध्वनी द्वारे चर्चा केली असता त्यांनी आमच्या महाविद्यालयातील ब्लड बँक मध्ये सदरील चाचण्या ( NAC टेस्ट ) करण्यात येत नाहीत असे सांगितले. NAC टेस्ट चाचणी हि रक्त घटकातील HIV च्या विषाणूंना ट्रेस करण्यासाठी येते. या चाचणीचा कालावधी १५ दिवसांच्या अंतराचा असतो.
७ दिवसांपूर्वी एका लहान मुलाचे अपेन्डिस चे ऑपेरेशन झाले , संबंधित शल्य चिकित्सकांनी ऑपेरेशन च्या दुसऱ्या दिवशीच फक्त रुग्णाच्या तब्येतीचा आढावा घेतला , त्यानंतर त्याच्या आढाव्यासाठी त्यांनी नंतर वॉर्डात पाचारण केलेच नाही. ऑपेरेशन झाल्यानंतर सुमारे ८ दिवस उलटूनही सदरील रुग्णास इस्पितळात उपचाराच्या नावाखाली अडवून ठेवण्यात आले आहे. त्याच प्रमाणे नर्सिंग स्टाफ रुग्णांशी अरेरावीने व उद्धटपणाने वागणूक देत असल्याचे त्रस्त रुग्णांकडून मिळालेल्या तक्रारीद्वारे कळले. अनेक रुग्णांचे नातेवाईक परिचारिकांच्या त्रासापायी त्रस्त आहेत.३ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असेलेले हे महाविद्यालय प्रवेश घेतलेल्या विद्यार्थाना अद्ययावत वैद्यकीय ज्ञान कसे देणार हा मोठा प्रश्न आहे. कर्मचाऱ्यांची नियुक्ती वेगळ्या पदांवर होते परंतु त्यांच्याकडून त्यांच्या पदाव्यतिरिक्त अतिरिक्त काम करवून घेण्यात येते. त्याचा मोबदला देण्यात येत नाही.त्या मुळे संस्थेकडे येणार निधी हा नक्की जातो कुठे आहे आणि तंत्रज्ञाने युक्त महाविद्यालय कधी होणार आहे या कडे जनतेचे लक्ष लागून आहे.