पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या सेसफंड योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेतून 75 टक्के अनुदानावर 5अश्वशक्ती विद्युत मोटरपंप संच, पॉवर स्प्रेअर्स, मानवचलीत टोकनयंत्र तसेच रोटाव्हेटर, बीबीएफ प्लाटर, बियाणे खते पेरणी यंत्र आदी (40,000 रुपयांच्या मर्यादेत) साहित्य पुरविणे प्रस्तावित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत अर्ज बोलावण्यात येत आहेत.
तरी इच्छुक शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमधील कृषि विभागात कृषि अधिकारी (सामान्य) तसेच विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या योजनेअंतर्गत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी यांनी आवाहन केले आहे.