मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते कुडाळ येथे आज शासनआपल्यादारी अभियानाचा शुभारंभ झाला. या अभियानासाठी होणाऱ्या गर्दीने सर्व विक्रम मोडले आहेत. राज्यात क्रांती करणारा हा कार्यक्रम ठरेल असा विश्वास व्यक्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.