कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच असा’ असा पाहुणचार करणाऱ्या आणि महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज दिली. राज्यातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध प्रकल्प राज्यात सुरु असून देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प सुरु असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. #सावंतवाडी येथे सुमारे 110 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
कोकणच्या विकासासाठी कोकण प्राधिकरणाची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे. कोकणातील कोस्टल रोड एमएसआरडीसीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. कोकणात सबमरीन सुरु करण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. त्याचबरोबर कोकणातील स्थानिक मालाचे ब्रॅंडिंग करुन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सावंतवाडी शहरातील मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलही उभारण्यासाठी निधी देवू. तसेच विकास टप्पा क्रमांक २ साठी मागणी नुसार आवश्यक सर्व निधी दिला जाईल, असे आश्वासित करुन समृध्द कोकण घडविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.