वेकोलीचे पोवनी सब एरिया अंतर्गत माती व कोळसा उत्खननाचे कंत्राटदार म्हणून हर्षा कंपनी काम करत आहे. या कंपनीमध्ये साखरी आणि परिसरातील भूमिहीन शेतकऱ्यांचे बेरोजगार तरुणांना काम मिळावे यासाठी आज काँग्रेस पक्षाचे वतीने साखरी येथील गावकरी व तरुणांसह धडक देऊन जाब विचारण्यात आला.प्रदेश काँग्रेसचे ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष तथा राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमाकांत धांडे यांनी कंपनीत रोजगार देताना काँग्रेस पक्षाच्या वतीने शिफारस केलेल्या युवकांना डावलण्यात आले असून इतरांना मात्र सामावून घेण्यात आल्याचा आरोप यावेळी केला.