साकोली तालुक्यातील नागरिकांसाठी मंगलमूर्ती सभागृहात आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित राहून महसूल, जिल्हा परिषद, कृषी, वीज वितरण कंपनी, घरकुल, पाणी समस्या अशा विविध विषयांवर आपल्या अडचणी मांडल्या. यातील काही तक्रारी आणि समस्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून निकाली काढल्या तर काहींच्या दृष्टीने ठराविक कालावधीत त्याचा निपटारा करण्यासाठी सूचना दिल्या. सहज सुटणाऱ्या मात्र सरकारी यंत्रणेच्या कारभाराला बळी पडलेल्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या होत्या.
याप्रसंगी सर्वश्री माजी आमदार डॉ.हेमकृष्णजी कापगते , बाळाभाऊ काशिवार, जेष्ठ नेत्या सौ. रेखाताई भाजीपाले, तालुका अध्यक्ष लखनजी बर्वे, पं.स. सभापती गणेशजी आदे, जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरीताई नेवारे, दीपलताताई समरीत, वनीताताई डोये, लायकरामजी भेंडारकर, माजी सभापती उषाताई डोंगरवार, माजी नगराध्यक्षा धनवंताताई राऊत, पवनजी शेंडे, तालुका महामंत्री प्रदीपजी गोमासे, उपसभापती सरिताताई करंजेकर, कृष्णाजी कोमाडवार, पंचायत समिती सदस्य सुशिलजी गणतीर, तसेच सर्व विभागांचे कर्मचारी तथा दिव्यांगबांधव उपस्थित होते.