पो. डा. वार्ताहर, नागपूर, कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, स्थानिक शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 2 जूनला सकाळी 10 वाजता झिंगाबाई टाकळी येथील दत्त सभागृहात “छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे” आयोजन करण्यांत आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक विधानसभा सदस्य विकास ठाकरे राहणार आहेत.
या शिबीरात दहावी व बारावी नंतर काय? भविष्यातील शिक्षण रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगार संधी आदी बाबत विद्यार्थ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच रोजगार व स्वयंरोजगार शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँक व वित्तीय संस्थेचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबीरास जास्तीत जास्त संख्येने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक यांनी केले आहे.