पो.डा. प्रतिनिधी , नागपूर
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने न्यायमंदीर परिसर, जिल्हा न्यायालय सिव्हिल लाईन्स येथे तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर जयदीप पांडे, न्यायिक अधिकारी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्या सुरेखा बोरकुटे, अधिवक्ता, पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
प्रारंभी तंबाखू विरोधी दिवसानिमित्त जिल्हा न्यायालय परिसरात जनजागृती रॅली आयोजित करुन तंबाखू विरोधी घोषणा देण्यात आल्या. सोबतच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यास होणाऱ्या दूष्परिणाम व तंबाखू प्रतिबंध कायद्यबाबत माहिती देवून नागरिकांना माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले.
या रॅलीत विधी स्वयंसेवक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी सहभागी झाले होते.